• A family well-known in each village of Maharashtra’s 10 districts.
  • Language: English | Hindi

डोंगरकडा, कळमनुरी येथील स्वयंभू श्री जटाशंकर भक्तीनिवास लोकार्पण सोहळा

#डोंगरकडा, कळमनुरी येथील स्वयंभू श्री जटाशंकर भक्तीनिवास लोकार्पण सोहळा 08 नोव्हेंबर २०२२ ला साजरा झाला. तिथे मा. मंत्री सुर्यकांताताई पाटील यांची आणि माझी आयुष्यातली  पहिली भेट होती. मा. मंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी माझे २ मिनिटे संबोधन ऐकल्यानंतर असे उदगार काढले की असे वाक्य उत्स्फुर्तपणे  वापरले कीसमीर दुधगांवकर याने अमेरिकेत इंजिनिअरिंगसाठी जाऊनही सोबतच गीतेचा अभ्यास केला हे ऐकुन समीरचे वडील गणेशराव दुधगांवकर माझे सहकारी असल्याबाबत भूषण वाटले. ”!

तिथला वृत्तांत नक्की वाचा आणि श्रीमदभगवतगीता अभ्यास केल्यास आपोआप impression चांगले होते हा बोध घ्या… बसल्या बसल्या श्लोक शिकायला मिळतील म्हणून नक्की वाचाच.

वाचाल तर वाचाल..!!

————————

मा. मंत्री सुर्यकांताताई पाटील, खासदार हेमंत पाटील, समीर गणेशराव दुधगांवकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती

——————-

स्वयंभू श्री जटाशंकराची पावन भूमी मौ.डोंगरकडा ता.कळमनुरी जि. हिंगोली येथे कै सौ.समिंद्राबाई नागोराव अडकीने व नागोराव आबाजी अडकीने यांच्या स्मृतिप्रित्यार्थ स्वयंभू श्री जटाशंकर भक्तीनिवास वास्तूचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

श्री जटाशंकर भगवंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ही वास्तू खूप उपयोगी येणार असून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना सोयीचे होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजक श्री डी. एन अडकीने यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यार्थ केलेले हे समाज उपयोगी भक्तीनिवास करणार असा शब्द मागच्या वर्षी रामकथेत दिला आणि तो पाळला. इतर अवाजवी खर्च टाळून अश्या सामाजिक उपक्रमातूनच ईश्वरभक्ती साध्य होते आणि आई वडीलांच्या कधीच न संपणार अश्या ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न केला असे प्रास्ताविक केले.

समीर दुधगांवकर यांनी अमेरिकेत असतांना अभियांत्रिकी सह श्रीमदभगवदगीता अभ्यास सुद्धा केला त्यातील दोन श्लोक सांगितले.

“सोळावा अध्यायातील तीन श्लोकात पैसा पैसा करणारे लोक राक्षसी प्रव्रुत्तीचे असतात हे शिकविले असे समीर यांनी उपस्थितांना सांगितले. अठराव्या अध्यायाचा पाचवा श्लोक यज्ञ, दान आणि तप या कर्मांचा त्र्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. Acts of sacrifice, charity and penance are not to be given up; they must be performed. Indeed, sacrifice, charity and penance purify even the great souls. त्यामुळे अडकीणे काकांनी दानत दाखवुन गीतेचा श्लोक आचरणात आणला हे वाखाणण्याजोगे आहे.”

मा. मंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीला समीर दुधगांवकर याने अमेरिकेत इंजिनिअरिंगसाठी जाऊनही सोबतच गीतेचा अभ्यास केला हे ऐकुन समीरचे वडील गणेशराव दुधगांवकर माझे सहकारी असल्याबाबत अभिमान वाटला हे नमुद केले.

मा. मंत्री पाटील ताई पुढे म्हणाल्या की हा कार्यक्रम संख्यात्मक किती मोठा आहे ह्यापेक्षा गुणात्मकतेने खुपच मोठा आहे. अडकीणे यांनी आई-वडीलांच्या नावे हे भक्तनिवास उभारले यासाठी त्यांचे कौतुक केले.

या लोकार्पण सोहळ्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर, भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्ष शिंदे समीर गणेशराव (दुधगांवकर) गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक दत्तरावजी अडकीने, डी.एन अडकीने, ऍड.सतिष देशमुख, बाबुराव वानखेडे, मधुबापू अडकीने, कल्याणराव नादरे, विलास सावंत, सुधाकर लोमटे, ठाकुरसिंह बावरी यांच्यासह भाविक भक्त आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*