श्री समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
अमेरिकेतून पदव्युत्तर अभियंता
सकल मराठा जनसेवक
माजी जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) भाजपा
(महाराष्ट्र भाजपाने मराठा समाजाचा अपमान
केल्यामुळे सदस्यत्वाचा राजीनामा)
जन्मतारीख : 03 ऑगस्ट 1977
शिक्षण: अमेरिकेतून पदव्युत्तर अभियंता
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी (माता व मातृभूमी स्वर्गापेक्षा जास्त मोलाची आहे) ही संकल्पना आचरणात आणून, अमेरिकेत मिळालेली संशोधन शिष्यवृत्ती सन 2003 मध्येच नाकारून जन्मभूमीच्या सेवेसाठी भारतात परतणारे.
शिक्षण
- M.S. Mech Engg, Detroit अमेरिकेतून पदव्युत्तर अभियंता
- सन 2002 पासून श्रीमदभगवतगीता अभ्यासक
- RSS प्राथमिक शिक्षा वर्ग (4 जून 2022 ते 12 जून 2022)
- पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद संबोधनाचा अभ्यास
- जागतिक अर्थशास्त्र
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्रातील शिर्डी येथे आले होते. या दौऱ्यात महाराष्ट्र भाजपा मराठा समाजाचा अपमान होईल अशा पद्धतीने वागली. मुघलांना यशस्वीपणे रोखण्याचे आणि हिंदुत्व वाचवण्याचे श्रेय मराठा समाजाला जाते. भाजप स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष समजतो. तरीही भाजपाने गेल्या 400 वर्षांपासून हिंदुत्व वाचवणाऱ्या मराठ्यांचा अपमान केला. हे स्वीकारार्ह नाही म्हणून समीरने भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
भाजपशी जवळीक असताना, विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना, समीरला भाजपा कार्यकर्ता असल्याचे समाधान वाटत होते, ज्यांनी गेल्या काही वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले (श्री राम मंदिर निर्माण, कलम 370 काढणे, हायवे, घरकुल निर्मिती इ.) परंतु मराठा समाजाचा अपमान अजिबात समर्थनीय नाही.
दायित्व
सकल मराठा समाज जनसेवक – आंदोलनात सक्रीय योगदान, आत्मबलिदान करणऱ्या लोकांच्या परिवारांना 50,000 ची सांत्वनपर मदत.
- इतरांना संधी मिळावी यासाठी दोन टर्म नंतर पदत्याग
संघ लोकसेवा आयोग (UPSC) उमेदवाराचा स्वभाव जाणून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने संगणकाव्दारे परिक्षा घेते. जगातील प्रथम क्रमांकाच्या कंपनीव्दारा अशा पद्धतीच्या शास्त्रीय परिक्षेनुसार समीरचे स्वभावगुण ESTJ प्रकारचे आहेत.
ESTJ प्रकारचे व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील प्रकारचे गुणविशेष आहेत.
- जीवनातील आदर्श आणि विचारधारेच्या बाबतीत स्पष्टता ठेवणारे.
- नैसर्गिक नेतृत्व गुण
- एकाग्रतेने ऐकून घेण्याचा गुण बाळगणारा
- सर्वोत्कृष्ट संघटन कुशलता
- आदर्श जीवनमूल्य तसेच संस्कृतीची जाण राखणारा व्यक्ती
- अकार्यक्षमतेला सहन न करणारे
- सृजनशीलतेत आनंद घेणारे
- विश्वासार्ह, मेहनती तसेच विश्वास ठेवण्यास पात्र
- योजनांना पुर्णत्वास घेऊन जाणारा
इतिहासातील काही लोकांची नावे ज्यांचे स्वभावगुण ESTJ प्रकारचे आहेत.
- जेम्स मोनरो – राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
- हॅरी एस ट्रुमन – राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
- जॉर्ज डब्लू बुश – राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
- सॅम वॅाल्टन- संस्थापक, वॅालमार्ट आजही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (1992 मधील त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांच्या परिवारातील आजची संपत्ती त्यांची मानली तर !!)
- जॉन डी रॉकफेलर – उद्योजक आणि लोककल्याणकारी व्यक्ती, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक.
- बिली ग्रॅहम – धर्मगुरू तथा लेखक राष्ट्राध्यक्षांना अध्यात्मिक सल्ले देणारे व्यक्ती.
विस्तृत
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी (माता व मातृभूमी स्वर्गापेक्षा जास्त मोलाची आहे) ही संकल्पना आचरणात आणून, अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठातील प्रोफेसर वेन गिब्सन यांनी 2003 मध्ये देऊ केलेली संशोधन शिष्यवृत्ती नाकारून जन्मभूमीच्या सेवेसाठी भारतात परत. जन्मभूमीची सेवा करण्याची कल्पना होती तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्वत:चे वडिल माजी मंत्री आणि माजी खासदार ॲड.गणेशराव दुधगांवकर यांना आदर्श मानून आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीवर जीवन आधारित असावे हा विचार मनात होता.
महाराष्ट्रातील सर्वोच्च उद्योग संघटनेचे नेतृत्व करून आणि एक उदयोन्मुख राजकीय नेते म्हणून समीर दुधगांवकर यांची सातत्याने ही वाटचाल सुरु आहे.
थोडक्यात पण महत्वाचे..!
मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश चांगल्या शैक्षणिक संस्थांसोबत काम करून, तरुणांना उद्योगात रोजगार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच उद्योग वाढीसाठी प्रयत्न, भारत सरकारची अनेक धोरण सुचविणाऱ्या टीमचा भाग असणे यातून समीर सर्वांसाठी समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहतो, राज्य उद्योग संघटनेच्या शिक्षण समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे महाराष्ट्र चेंबरने कौतुक केले, महाराष्ट्र चेंबरच्या AGM मध्ये थोर नेते श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील प्रतिष्ठित दैनिक सकाळने त्यांना 'परभणीचे युथ आयकॉन' म्हणून संबोधले होते यामागे मुख्य कारण त्यांची दूरदृष्टी असावी.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत समीरने आपल्या अमेरिकेतील अनुभवावर आधारित राजकीय भाषण बोरी येथे केले, जे अनेक लोकांना आवडले, त्यांच्या आयुष्यातील दुसरे राजकीय भाषण त्यांनी 1 एप्रिल 2019 रोजी जिंतूरला मोठ्या मंचावर केले, जे मोठ्या प्रमाणात पसरले. हे भाषण परभणी लोकसभा मतदारसंघातील पंतप्रधान मोदीजी यांच्या उमेदवारासाठी केले .
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, समीरने शिस्तबद्ध उद्योगी तरुण म्हणून त्यांच्या थेट प्रभावाखाली 20000 + मते एकत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ॲड. गणेशराव दुधगांवकर यांनी निवडणुकीत सर्वात निर्णायक भूमिका बजावली आणि पंतप्रधान मोदीचे उमेदवार हे फक्त 40,000 च्या फरकाने निवडून आले .
महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, जिंतूर- सेलू मतदारसंघासाठी एक नवीन चेहरा,प्रामाणिक, सुशिक्षित असा भाजपचा उमेदवार म्हणून समीर हा सर्वोत्तम पर्याय होता, परंतु ही जागा तत्कालीन कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला देण्यात आली.
टीम समीरचे काही क्रिएटिव्ह व्हिडिओज येथे पाहता येतील.
दुधगांवकर कुटुंबाशी संबंधित अनेक आठवणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे सामाजिक कार्य
येथे क्लिक करा
Date: - 14 May 2019
समीर दुधगावकर यांच्या टीमने मांडलेली Doubling of Jobs ही संकल्पना अमलात आणली तर 5 वर्षात 1 कोटी ते 5 कोटी रोजगार सहज निर्माण होतील हे नक्की. या संकल्पनेनुसार फक्त हेच वाढणार नाही तर यामुळे देशाच्या जीडीपीचे (दरडोई उत्पन्न) 15%नुकसान कमी होईल व अनेक कारणामुळे प्रत्येक व्यवसायाला 15% अधिक कार्यक्षम होण्यास मदत करेल. अशी सर्जनशील विचारसरणी समीरला एक वैचारिक नेता बनवते!!
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कार्यालयाला कळवण्यात आले आहे आणि लवकर पुढील कारवाई अपेक्षित आहे. परंतु एका प्रसिद्ध म्हणीनुसार, "जर ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल तर तुम्ही कृती कराल, जर ते नसेल तर तुम्ही कारणे सांगाल." या संकल्पनेच्या PDF ला भेट देण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा