आदरणीय दुधगांवकर कुटुंबाच्या त्यानंतरच्या पिढीमध्ये अमेरिकेतून शिक्षण घेऊन परतलेले व महाराष्ट्र उद्योगाचे नेतृत्व करणारे समीर गणेशराव दुधगांवकर हे परभणी जिल्ह्याची सेवा करत आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नेतृत्व करून समीर यांनी सर्वांना अभिमानीत केले आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात समीर यांनी आपल्या कार्यामुळे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. समीर यांना ईश्वरकेंद्रित कर्मयोगी म्हणून ओळखले जाते. त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास इ. स. 2002 पासूनच सुरू केला जेव्हा ते अमेरिकेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. त्यानंतर 2014 मध्ये माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर समीर यांनी अध्यात्मिकता दाखवली असे नाही तर या पूर्वीपासूनच 2002 पासून समीर गणेशराव दुधगांवकर, एक वैचारिक नेतृत्व,अंतर्मनाच्या आवाजाचे ऐकून दैवी शिकवणींना बांधले गेले होते. श्री समीर हे सातत्याने जनतेला उद्देशून भगवद्गीतेतील श्लोकाचे आजच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन विश्लेषण करतात.
भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाचा अपमान केल्याने श्री समीर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बीजेपी हिंदुत्ववादी पक्ष आहे. मराठे हे नेहमी हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढले आहेत. आज शेती क्षेत्रात काम करणारा हा कुणबी समाज अडचणींमुळे मागास वर्गामध्ये समाविष्ट करावे म्हणून मागणी करतो आहे. लोकशाही पद्धतीने श्री मनोज जरांगे पाटलांच्या सोबत सातत्याने लढतो आहे. आंतरवाली सराटीत एक करोड लोकांची सभा झाली. त्यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात होते; पण त्यांनी साधी दखल; घेतली नाही व यातुन भाजपाने मराठा समाजाचा अपमान घडवून आणला म्हणून समीर यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला…