Skip to main content

सहकार महर्षी कै.लिंबाजीराव
नागोराव दुधगांवकर

सहकारमहर्षी कै. लिंबाजीराव नागोराव दुधगांवकर यांच्या विषयी

राज्य सरकारच्या सहकार महर्षि पुरस्काराने सन्मानित

अध्यक्ष (1970-1987): परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCCB (आतापर्यंतचे सर्वात यशस्वी अध्यक्ष)

जिल्हा परिषद अध्यक्ष (1993) आणि उपाध्यक्ष (1962)

बिनविरोध जिल्हा परिषद अध्यक्ष होणारे राज्यातील कदाचित एकमेव उदाहरण

सहकार महर्षि स्वर्गीय लिंबाजीराव नागोराव दुधगांवकर यांचा जन्म 1934 मध्ये राम नवमीच्या दिवशी झाला होता.
स्वर्गीय लिंबाजीराव दुधगांवकर यांनी 1962 मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष तर 1993 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जरी कमी असले तरी त्यांचे साहित्य वाचन भरपूर होते. ते त्यांच्या हसऱ्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या कथा आजही मराठवाड्याच्या राजकीय गल्ली-बोळांमध्ये ऐकवल्या जातात.
कै. लिंबाजीराव दुधगांवकर 1970 ते 1987 च्या दरम्यान परभणी DCC बँकेचे अध्यक्ष असताना DCC बँक राज्यात दुसऱ्या स्थानावर होती. यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने सहकार महर्षि पुरस्काराने सन्मानित केले होते.
एमसीसी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण हे त्यांचे उमेदवार श्री किशनराव वीर यांना मत टाकावे ही विनंती घेऊन तत्कालीन अध्यक्ष श्री लिंबाजीराव दुधगांवकर यांना भेटण्यासाठी परभणीला आले होते.
कै. लिंबाजीराव नागोराव दुधगांवकर हे कदाचित देशातील त्या उमेदवारांपैकी एक आहेत, ज्यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून देण्यात आले होते.

शेतकऱ्यांचे आणि जिल्ह्याचे हित सदैव अग्रक्रमावर ठेवणाऱ्या लोकसेवक दुधगांवकर परिवाराच्या काही खास आठवणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

MSC बँकेविषयी काही महत्वाच्या गोष्टी

सहकारी चळवळीचे यश हे सहकारी संस्थांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा, सभासदांच्या नैतिकतेवर अधिक अवलंबून असते. सहकारी चळवळीच्या अनुषंगाने विचार करता महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित राज्य आहे.

महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आहे. ज्याच्या अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे. मध्यम स्तरावर 31 जिल्हा बँका व तळाशी 21085 प्राथमिक कृषी पतसंस्था कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्यातील अतिरिक्त संसाधनांचे समतोल केंद्र म्हणून कार्यरत आहे. ज्याव्दारे ती बहुआयामी विकास व समृध्दीची खात्री देते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक आहे.

त्याशिवाय `दि बँकर` या लंडनस्थित ख्यातनाम नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही भारतातील एकमेव सहकारी बँक (संस्था) आहे जी 9 वेळा जगातील सर्वोत्कृष्ट 1000 बँकांमध्ये “आर्थिक स्थैर्याच्या“ (भांडवली पर्याप्तता) निकषावर निवडली गेली आहे. रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या दुसऱया सूचीमध्ये (शेडयूल्ड -II) राज्य बँकेचा समावेश करण्यात आला आहे.

(स्त्रोत: MSC बँक वेबसाईट)

Enquire Now