Skip to main content

मराठवाड्याचे कर्मवीर, लोकनेते
एडवोकेट गणेशराव दुधगांवकर

मा. मंत्री, मा. खासदार गणेशराव दुधगांवकर

प्रख्यात माजी मंत्री, खासदार

अमरावती आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांचे माजी पालकमंत्री

माजी अध्यक्ष – महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड

संस्थापक अध्यक्ष – ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणी. स्थापना 1981

देशातील पहिल्या सहकारी खत कारखान्याचे (SSF Fertilizer) संस्थापक

सुमारे 500 वर्ष जुन्या पंढरपूर आषाढी वारीचा भाग असणारे हे कुटुंब आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या अभिषेकाचा सन्मान ज्या कुटुंबाला मिळाला आहे अशा समृद्ध परिवारात 1 सप्टेंबर 1945, गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) यांचा जन्म झाला. लहानपणी श्री गणेशराव यांच्या विचारांवर प्रभाव टाकणारे दोन मुद्दे ठरले -चांगल्या ऐतिहासिक परिवाराचा पायंडा व स्वतःची सत्कार्य करण्याची दुर्दम्य इच्छा !  श्री  दुधगांवकर  यांचे PUC म्हणजे आजचे 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्णा या ठिकाणी झाले. त्यांच्या शिक्षकांपैकी एक म्हणजे श्री. बापूराव पारवे, ज्यांचे वय 92 वर्ष आहे.

श्री दुधगांवकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर (म्हणजे जुने औरंगाबाद) संचालित श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे घेतले. नंतरच्या काळात मोठा मित्र परिवार भेटत गेला. त्यामध्ये स्व. बापू आडकिने, साहेबराव लबडे, स्व. सुरेश जाधव, दत्ता चौगुले अशा व्यक्तींचा उल्लेख करता येईल. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना त्यांची भेट अतिशय गुणी असणारे श्री. फकीर मुंजाजी शिंदे यांच्याशी झाली.

श्री दुधगांवकर यांच्या जीवनात सुंदर असा क्षण 2 जुलै 1971 साली आला जेव्हा ते संध्या श्रीधरराव कदम (धारासुरकर) यांच्याशी विवाहबद्ध झाले. एका क्रीडा स्पर्धेदरम्यान त्यांनी प्रतिष्ठित कुटुंबातील एक सुशिक्षित मुलगी कु. संध्या श्रीधरराव कदम (धारासुरकर) यांना पाहिले. हा प्रेम विवाह होता. गणेशरावांचे प्रेम जडले संध्याताईवर. कॉलेजमध्ये असतानाच ते एका मराठा मुलीच्या प्रेमात पडले. गणेशराव तेव्हाही मनाने क्रांतिकारक होते. त्या काळात लग्नामध्ये हुंडा घेण्याची प्रथा होती; परंतु गणेशराव या सामाजिक दुष्कृत्याला बळी पडले नाहीत आणि केवळ शिकलेल्या मुलीशीच लग्न करावे हे मनाशी पक्के केले होते.

बाकी इतिहास आहे….

मा. मंत्री, मा. खासदार गणेशराव दुधगांवकर एक – लोकनेता

श्री गणेशराव दुधगांवकर यांना राजकीय पार्श्वभूमी असणारे कुटुंब लाभले ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सक्रिय असा सहभाग नोंदविला.

मराठवाडा विकास आंदोलनाचे युवा नेता म्हणून श्री दुधगांवकर यांना प्रसिद्धी लाभली, या विकास आंदोलनाचे मुख्य मुद्दे होते-
I) मराठवाड्याचे व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे
II) जायकवाडी प्रकल्प निम्न योजना विष्णुपुरी सिंचन प्रकल्प यांना प्राधान्य देणे
III) रेल्वे ब्रॉडगेज करणे
IV) संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करणे

1974 व 1983 मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व बदल करण्यात सक्रिय सहभाग

हुंडा प्रथेचा विरोध करून लग्न केले व समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला

श्री गणेशराव दुधगांवकर हे एक असे धडाडीचे नेते आहेत ज्यांनी 5 मतदारसंघातून निवडणूक लढवली

1990 च्या दशकात मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते

2 फेब्रुवारी 1983 साली मंत्री म्हणून शपथविधी झाल्यावर आपल्या विकासात्मक दृष्टीने मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील Bajaj Auto Plant, Indo German Tool Room(IGTR), Center For Electronic Design and Technology(CEDT), Maharashtra Center For Entreprenuership Development(MCED), Central Institute of Plastic Engineering Technology(CIPET) यांची स्थापना ही प्रमुख कार्ये म्हणता येईल

श्री वि. स. पांगे जी ज्यांना EGS योजना प्रणेते मानले जाते त्यांनी दुधगावकर यांची EGS योजना मंत्रीकार्याबद्दल स्तुती केली होती.

मराठवाड्यात तंत्रशिक्षणात खूप मोठी क्रांती घडवली. तंत्र शिक्षण देण्यासाठी MGM अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय विद्यापीठ, MIT पुणे यांची सुरुवात त्याच्या कार्यकाळात झाली.

श्री दुधगांवकर यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अमरावती विद्यापीठ, वित्त कार्यालय, IGP चे कार्यालय व अमरावती महापालिका स्थापन केली

हाजीरा (सुरत) – बुलढाणा-परभणी- नागपूर-ओडिसा अशा LPG GAS pipe line ची संकल्पना श्री दुधगांवकर यांनी 1980 साली मांडली होती

श्री दुधगांवकर यांनी देशाच्या सहकार धोरणात बदल करून जिंतूर या ठिकाणी देशातील पहिला खताचा कारखाना उभा केला

श्री दुधगांवकर यांनी ज्ञानोपासक शिक्षण मंडळ स्थापना करून शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा दिलेली आहे. आज या मंडळाच्या एकूण 18 संस्था कार्यान्वित आहेत. या मंडळाच्या महाविद्यालयाला NAAC समितीने दोनदा A दर्जा बहाल केला आहे

पंधराव्या लोकसभेत संसद भवनात सगळ्यात जास्त सहभाग दाखवण्याचा मान श्री दुधगांवकर यांना प्राप्त झाला

सोळाव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात श्री मोदी यांचे नाव गाजत होते; शिवसेनाप्रमुखांनी दुजाभाव दर्शविला या कारणाने खासदारकी नाकारली

2019 साली झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत प्रमुख भूमिका बजावली

अनेक सहकारी संस्था, APMC, मार्केटिंग फेडरेशन व DSM शैक्षणिक संस्थेत अनेक लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली

अनेक कार्यकर्त्यांना आमदार होण्यासाठी निर्णायक मदत केली.

संक्षिप्त माहिती

नाव: श्री ॲड. गणेशराव नागोराव दुधगांवकर (बापूसाहेब)

जन्मगाव: दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी

पत्ता: दुधगांवकर फार्म हाऊस पोखर्णी फाटा (नृसिंह)

कायमचा पत्ता: ज्ञानोपासक महाविद्यालय पोस्ट बॉक्स 51, परभणी 431 401

दूरध्वनी क्र.: (02452) – 242016

भ्रमणध्वनी क्र.: 9422 72 7444

जन्म दिनांक: 09-09-1945( गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी)

शिक्षण: बी.ए.एल.एल.बी एडवोकेट

पत्नी: डॉ. सौ. संध्याताई गणेशराव दुधगांवकर (एम.एस.सी.पी.एच.डी)

मुलगी: मधुरा गणेशराव दुधगांवकर एम. एस. (गणित व संगणकशास्त्र), गुगल या कंपनीत वरिष्ठ मॅनेजर पदी कार्यान्वित

मुलगा: समीर गणेशराव दुधगांवकर (एम. एस. यूएसए 2001)

छंद: व्याख्याने ऐकणे, वाचन व परिचर्या

मा. मंत्री, मा. खासदार गणेशराव (दुधगांवकर) यांचे कार्य

सामाजिक व राजकीय प्रवास
  • काँग्रेस पार्टीमध्ये 1975 साली सामील
  • जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष 1976
  • जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य काँग्रेस 1987
  • उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस 1994
  • संपर्कप्रमुख शिवसेना जालना जिल्हा 2004 ते 2009
राजकीय कारकीर्द
  • 1980: काँग्रेसचे आमदार, वसमत मतदार संघ जिल्हा हिंगोली
  • 1983-1985: श्री वसंत दादा पाटील व श्री रामराव आदिक यांच्या काळात राज्यमंत्री पद भूषविले (रोजगार हमी योजना व तंत्रशिक्षण)
  • 1985: आमदार, जिंतूर मतदार संघ
  • 1990: पाथरी मतदारसंघ, अटीतटीच्या निवडणुकीत पराभूत
  • 1994: अपक्ष म्हणून परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 मतांनी पराभूत
  • 2009: 15 वी लोकसभा खासदार, शिवसेना. 19 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडून येण्याचे देशातील एकमेव उदाहरण
सहकार क्षेत्रातील कार्य
अनेक सहकारी संस्थांमध्ये डायरेक्टर
  • अध्यक्ष: जिंतूर तालुका जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था
  • अध्यक्ष: जिल्हा खरेदी विक्री संघ
  • संस्थापक अध्यक्ष: PAFFCO (1989-2001)
  • डायरेक्टर: मरकेटका फेडरेशन Mumbai
  • अध्यक्ष: विपनन महासंघ महाराष्ट्र राज्य
  • डायरेक्टर: IFFCO नवी दिल्ली 1989
  • डायरेक्टर: NAFED 1987-1988
  • डायरेक्टर: कृषक भारती सहकारी संस्था
  • अध्यक्ष: ज्ञानोपासक शहरी सहकारी बँक, परभणी
शैक्षणिक कार्य
तंत्र शिक्षण मंत्री म्हणून खाजगी शिक्षण, तंत्रशिक्षण योजनेची सुरुवात केली. ज्या मुळे भारती विद्यापीठ, MGM, MIT सारख्या संस्था स्थापन झाल्या

45 आयटीआय संस्था आणि 45 टेक्निकल माध्यमिक शाळा मराठवाड्यात सुरू केल्या.

संस्थापक अध्यक्ष ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी (स्थापना 1981)

ज्ञानोपासक शिक्षण मंडळ मध्ये आजपर्यंत 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले

ज्ञानोपासक कॉलेज परभणी ला NAAC चे A grade मिळाले

विद्यापीठातील पहिल्या पाच कॉलेज पैकी एक म्हणजे ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी

ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संस्थेचे 3 कॉलेज आणि 6 माध्यमिक शाळा आहेत.

ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर यांच्या कारकिर्दीचा तपशील जाणून घेण्यासाठी व पीडीफ डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा

करिअर प्रोफाइल

संसदेचे सदस्य
म्हणून काम

महान नेते दुधगांवकर यांचा प्रवास – टप्पे

जनसेवक नेता –
सुवर्ण क्षण

Enquire Now