मराठा आरक्षणाचे लोन आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीने पेटून उठले आहेत. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर संपूर्ण मराठा समाज आता एकवटला आहे. या आंदोलनामध्ये परभणी जिल्हा देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. आमरण उपोषण असेल किंवा साखळी उपोषण असेल किंवा मनोज भाऊंची मुंबई पदयात्रा असेल, जिल्ह्यातील मराठा समाजातील लोक मोठ्या हिरीरीने त्यात सहभागी झाले.
या आंदोलनामध्ये समीर दुधगांवकर यांनी स्वतःला अक्षरश: झोकून दिले आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे काम करत असताना मराठा समाजावर केंद्र आणि राज्य सरकार यांनी केलेला अन्याय सहन न झाल्यामुळे तडकाफडकी भाजपा सदस्यत्वाचा त्याग करून त्यांनी समाजाच्या कार्यात उडी घेतली.
मनोज भाऊंनी प्रत्येक जिल्ह्यात आपल्या समाजाचे एक मदत केद्र असावे, हा मानस आपल्या एका सभेत बोलून दाखविला. तेव्हा लागलीच ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणातील दुधगांवकर कार्यालय समीर भाऊंनी समाजासाठी अर्पण करून टाकले. आज तिथे “सकल मराठा समाज परभणी जिल्हा मदत केंद्र” मोठ्या थाटात कार्यरत आहे. जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिले वहिले मदत केंद्र मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आले. या मदत केंद्राचे उद्घाटन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर अनेक युवकांनी असे संपर्क कार्यालय उभे करण्यासाठी समीर भाऊंची भेट घेतली आणि त्यांच्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
परभणी जिल्ह्यातील मराठा समाजातील अनेक आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत समीर दुधगांवकर यांच्या तर्फे करण्यात आली.
या मराठा आंदोलनाची काही क्षणचित्रे :