Skip to main content

दुधगांवकर यांच्या वंशवृक्षाबद्दल

दुधगांवकर परिवाराचा वारसा

एक स्वातंत्र्यसैनिक कुटुंब ज्याला थोर संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांच्या अभिषेकाचा मान मिळाला आहे, शिर्डीचे साई बाबा, जगन्नाथपुरी पीठाधीश्वर श्रीमद्जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त आहे.
मराठवाड्यातील प्रसिद्ध परिवार ज्याने

  • जैन समाजातील एक, मारवाडी समाजातील दोन, वंजारी समाजातील दोन आणि अनेक मराठा तरुण यांना आमदार बनविण्यासाठी मदत केली आहे.
जिल्ह्यातील एकमेव परिवार ज्यांनी 1979 ते 1987 मध्ये PDCC बँक अगदी निर्दोषपणे चालविली. राज्यात आजकाल सापडणारे भ्रष्ट संचालक यांची नाही तर शेतकरी आणि कामगार यांची सेवा त्या काळात करण्यात आली.
मा. मंत्री मा खासदार अ‍ॅड. गणेशराव दुधगांवकर हे विकासासाठी, त्यांच्या प्रामाणिक आणि अर्थपूर्ण दृष्टिकोणासाठी ओळखले जातात.
सहकारमहर्षि कै. लिंबाजीराव नाडे (मुरुड) जे गणेशराव दुधगांवकर यांचे व्याही होते हे

  • उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते समजले जातात.

दुधगावकर कुटुंबासाठी सुवर्ण क्षणांपैकी एक…

असा हा दुधगांवकर परिवार महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. अनेक पिढ्यांपासून या परिवाराला पंढरपूरच्या वारीमध्ये वेळापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करण्याचा मान मिळाला आहे तसेच अनेक गावांचे रझाकारांच्या जुलूमातून संरक्षण केले आहे. राजकीय बाबींमधील योगदान हे उत्कृष्ट आहे. हा परिवार म्हणजे एका विलक्षण मुल्यांवर आधारित यशोगाथाच आहे.

दुधगांवकर परिवाराने फक्त परभणी जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले योगदान दिले आहे.

उदाहरणार्थ, लिंबाजीराव दुधगांवकर यांचे नाव आजदेखील “परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये इतर कुठल्याही व्यक्तीने परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) इतक्या चांगल्या पद्धतीने चालविली नाही जितकी लिंबाजीरावांनी चालवून दाखवली” असे आदराने म्हटले जाते. आजपर्यत PDCC बँकेचे कार्यक्षेत्र परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध माजी मंत्री आणि खासदार श्री गणेशराव दुधगांवकर यांना राजकारणामध्ये दुर्मिळ गैर-भ्रष्ट राजकारणी असे म्हटले जाते.

या सर्व वैशिष्ट्यांमुळेच ऍड. श्री गणेशराव दुधगांवकर यांच्या निमंत्रणाखातर श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी पीठाधीश्वर पुज्यापद जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती परभणी येथे आले, अनेक दशकानंतर त्यांचे पाय परभणी शहराच्या मातीला लागले.

खालील वृक्ष दर्शवितो दुधगांवकर
कुटुंबातील सदस्य

कै. तानुबाई ज्ञानोबाराव दुधगांवकर
अ‍ॅड, गणेशराव दुधगांवकर (बापूसाहेब) यांची आजी

  1. कै. नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर
    (बापूसाहेब यांचे वडील)

  2. कै. राजाई नागोराव दुधगांवकर
    (बापूसाहेब यांची आई)

  3. कै. लक्ष्मीबाई नागोराव दुधगांवकर
    (बापूसाहेब यांची आई)

  1. कै. प्रयागबाई बापूराव निकम राधेकर
    (बापूसाहेब यांची मोठी बहीण)

  2. श्रीमती. रुक्मिणीबाई उत्तमराव शेजूळ
    (बापूसाहेब यांची मोठी बहीण)
    रा. आडगाव ता. माजलगाव जि. बीड

  3. कै. लिंबाजीराव नागोराव दुधगांवकर
    (बापूसाहेब यांचे मोठे भाऊ)

  4. कै. अंबादासराव नागोराव दूधगांवकर
    (बापूसाहेब यांचे मोठे भाऊ)

  5. कै. साहेबराव नागोराव दूधगांवकर
    (बापूसाहेब यांचे मोठे भाऊ)

  1. अ‍ॅड, गणेशराव दुधगांवकर तसेच सुविद्य पत्नी सौ. संध्या दुधगांवकर

  2. कु. रुपाली, कु. मधुरा, चि. समीर (बापूसाहेब यांची मुले)

कुटुंबातील निवडक व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी,
खाली दिलेल्या नावांवर क्लिक करा:-

Enquire Now